• Tue. Aug 16th, 2022

  पाऊस आला, तो देखील नोटांचा चिनावल मधील प्रकार वाचा संपूर्ण बातमी.

  ByKhandeshTimes

  Sep 24, 2021

  चिनावल ता.रावेर : आधी कधीच न झाल्यासारखे आश्चर्यकारक असा मंगळवारी चिनावलकरांना ATM मधून पैसे काढताना अनुभव आला . एटीएममध्ये टाकलेल्या अमाऊंट च्या पाचपटीने रकम निघत असल्याने ST स्टैंड परिसरातील ‘ ईडीकॅशच्या एटीएम केंद्रावर संध्याकाळी प्रचंड अशी गर्दी दिसून आली होती . पोलीस हे घटनेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर गर्दी कमी झाली. एटीएममध्ये ५०० रुपये आणि त्याच्या पटीत मध्ये रक्कम टाकल्यास ते पाच पट रक्कम बाहेर येत असल्याने सायंकाळी सहा ते रात्रीच्या साडेआठपर्यंत च्या सुमारास सहा लाखांची अमाऊंट काढली गेल्याचा दिला गेला आहे.

   

  पोलिसांच्या इंट्री वर पाऊस झाला बंद

   

  रात्री ९ ला एका कर्मचायांला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली . तर त्यांनी तत्काळ सावदा पोलिसांना याबाबत कळवले . ATM वर असलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवले त्याचबरोबर तात्काळ एटीएम बंद केले .

  Leave a Reply

  Your email address will not be published.