पाचशे रुपयाच्या नोटांनी गच्च भरलेले ‘ त्या ’ कपाटाचे फोटो हा सोशल मीडियावर जोरदार रित्या व्हायरल होतं असून पैशांनी भरलेले ते कपाट हे आयकर विभागाच्या छापेमारी मध्ये सापडले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . या छाप्याच्या दरम्यान सापडलेल्या या रोख रक्कमेचे फोटो सध्या सोशल मीडियावर दुनियेमध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे
हैदराबाद या ठिकाणांची एका फार्मास्युटिकल कंपनीवर आयकर विभागाचा रेड मध्ये जवळपास ५५० कोटी इतके रुपयांची विदाऊट बिलिंग अशी बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे . धक्कादायक बाब अशी की ५०० च्या नोटा या छाप्यामध्ये एका कपाटामध्ये दिसून आल्या असून ही रक्कम १४२ कोटी ८७ लाख एवढी असल्याची माहिती समोर येत आहे . या छापेमारीमध्ये पैसे भरुन ठेवलेले एक पूर्ण कपाट पाहून अनेकांना झटका बसलेला असून सोशल मीडियावर या कपाटाचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे .