पाटणादेवीच्या जंगलात झाला गुराख्याचा खून , देह हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला.

गणेशपूर : चाळीसगाव तालुक्यामध्ये गणेशपूर या ठिकाणी ५० वर्षीय असलेले गुराख्याचा मृतदेह हा पाटणादेवीच्या जंगलात हात पाय बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला . याप्रकरणी ग्रामीण पोलिसांमध्ये त्यांचा मुलगा दिनेश पाटील यांच्या तक्रारीवरून खुनाचा केला असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गणेशपूर या ठिकाणचे नाना ऊर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील ( ५० ) हे पाटणादेवीच्या अभयारण्यात गुरे चालण्याकरिता रानात प्रस्थान करत असत . नाना हे दोन ते तीन महिने जंगलात राहून जनावरांची राखण करत असत .याच दरम्यान बुधवारी त्यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत जंगलात आढळून आला . ही माहिती पोलीस पाटील भागवत सूर्यवंशी यांनी ग्रामीण पोलिसांना कळविली. मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत असल्याने घातपात झाला असल्यास शक्यता व्यक्त केली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.