पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावात बदली ! ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल , त्यामुळे तापले होते राज्यातील राजकारण .

जळगाव : पारणेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगांवात बदली करण्यात आली आहे . त्यांच्यावर शासनाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.जाणून घ्या सविस्तर …

* पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल :

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती . यात त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार नीलेश लंके व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठअधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते . या भावनिक क्लिपमुळे राज्यातील राजकारण तापले होते .

 * देवरे यांच्या विरोधात तापले होते वातावरण आता बदलीचा आदेश :

आमदार लंकेंवर भाजपकडून आरोप करण्यात आले होते . देवरे यांच्या विरोधात वातावरण तापले होते . देवरे यांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते त्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठविला होता . तसेच क्लिपची चौकशीचा अहवालही वरिष्ठांना पाठविला होता . त्यानुसार देवरे यांच्या बदलीचा आदेश आज राज्य शासनाचे सहसचिव डॉ . माधव वीर यांना काढला आहे . त्यानुसार देवरे यांची बदलीचा आदेश निघाला आहे .

 * बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई :

बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही आदेशात सांगण्यात आले आहे . त्यामुळे ज्योती देवरे व नीलेश लंके यांच्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे .

* जळगाव येथील संजय गांधी योजना कार्यालयात करण्यात आली बदली :

तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव येथील संजय गांधी योजना कार्यालयात बदली करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.