पालकमंत्री गुलाबराव पाटील : शेतकरी हितासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत ;तत्काळ भरपाई मिळवून देण्याची दिली ग्वाही.

शेअर करा.

तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी व नागरिकांना तत्काळ भरपाई मिळवून देणार असल्याची ग्वाही शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली .आम्हाला जेव्हा निवडणुका लढायच्या तेव्हा पक्षीय विचार करू , मात्र शेतकरी हितासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत असे त्यांनी सांगितले . जामनेर तालुक्यात गुलाबराव पाटील मुंबईत असल्याने त्यांनी तालुक्यातील हिंगणे , तोंडापूर येथे नुकसानग्रस्तांची प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आधीच निर्देश दिलेले आहेत . तर जिल्ह्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी शुक्रवारी जामनेर ओझर बुदूक व ओझर , भेट नुकसान झालेल्या नागरी भागाची पाहणी करून आपत्तीग्रस्तांना धीर देत राज्य शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत तत्काळ मदतीचे आश्वासन दिले . यामुळे शेतकरीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply