पावसाची जोरदार बॅटिंग : दोन दिवसांतच जिल्ह्यात ८९ .१ मिलिमीटर पाऊस , वाघूर धरणाचा जलसाठा ७३ % पोहचला.

जिल्ह्यात या वेळेस सर्वत्र पाऊस जोरदार बरसत आहे काही ठिकाणी तर अतिवृष्टी होऊन तो परिसर जलमय होत आहे यावेळेस सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसामध्ये सातत्य असून , दोन दिवसांत ८ ९ .१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे शनिवारी जोरदार बरसल्यानंतर रविवारी पावसाने तुरळक हजेरी लावली . जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९ ५.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे . रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ३४.८ मि.मी. पावसाची नोंद झाली . जळगाव तालुक्यात सर्वाधिक ६३.५ मि.मी. पाऊस झाला . सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात केवळ ६.७ मि.मी. पावसाची नोंद झाली . सर्वाधिक ३१.९ मि.मी. नोंद चाळीसगावात झाली . भडगाव तालुक्यात १७.५ मि.मी. पाऊस झाला . यावल तालुका १७.२ मि.मी. , जळ्गाव ०.१ मि.मी. , भुसावळ ०.८ मि.मी. , रावेर ३.६ मि.मी. , मुक्ताईनगर ५ मि.मी. , अमळनेर ६.४ मि.मी. , चोपडा ४ मि.मी. , एरंडोल ०.७ मि.मी. , जामनेर ३,३ मि.मी. , पाचोरा ५ मि.मी. नोंद झाली धरणगाव , बोदवड मात्र निरंक आहे .

जिल्ह्यात २ दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेने दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे . मंगळवारी जळगाव , धुळे व नंदुरबारमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे .

वाघूर धरणाचा जलसाठा ७३% वर पोहचला

जळगाव | वाघूर धरण यंदा शंभर टक्के भरण्यासाठी आणखी दोन मीटर पातळी जलसाठा वाढण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे . जळगाव शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या वाघूर धरणातील जलसाठ्यात दररोज वाढ होत आहे . आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दिलासादायक वातावरण तयार झाले आहे . गेल्या सहा दिवसांत जलसाठा १२ टक्क्यांनी वाढला असून ७३.६० टक्क्यांवर पोहोचला . गेली दोन महिने पाठ फिरवलेल्या वरूणराजाने जिल्ह्यासह राज्यभरात जोरदार हजेरी लावली आहे . आठवडाभरापासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे . दोन दिवसांपूर्वी देखील मुसळधार पाऊस झाल्याने जलपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे . त्यात पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेल्या धरणांमधील जलसाठा वाढायला सुरुवात झाली आहे . जळगाव शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या वाघूर धरणातही साठा वाढत आहे . ३१ ऑगस्ट रोजी वाघूर धरणात ६१.५८ टक्के जलसाठा होता . त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यात वाढ होऊन साठा ६५.४४ टक्के झाला होता शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या साठ्यात कमालीची वाढ झाली असून वाघूर धरण आता ७३.६० टक्के भरले आहे . गेल्या सहा दिवसात १२.२ टक्के वाढ झाली आहे . गेल्यावर्षी याच दिवशी धरण शंभर टक्के भरले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.