पावसाचे पुन्हा होणार आगमन हवामान खात्याने दिला इशारा, जाणून घ्या शहरांची नाव.

मुंबई : अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळं राज्यात पुढील तीन दिवसात दक्षिण कोकण , दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं वर्तविली आहे . हवामान तज्ज्ञ के . एस . होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे .हवामान विभागाकडून अॅलर्ट जारी पुढचे 2-3 दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

हवामान विभागाकडून यलो अॅलर्ट जारी 5 नोव्हेंबर : रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , कोल्हापूर , सातारा , पुणे , सांगली , सोलापूर , उस्मानाबाद , लातूर , अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय .8 नोव्हेंबरला कोणताही अॅलर्ट जारी केलेला नाही . सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी . सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून ढगांचा जोरदार गडगडाट सुरू आहे .

सलग तिस – या दिवशी अवकाळी पावसामुळे ऐन दिवाळीत नागरिकांची तारांबळ उडाली असून भात शेतीचेही मोठ्याप्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे . गेले तीन दिवस अचानक पडत असलेल्या पावसामुळे कापणी करून वाळत घातलेल्या भात पिकाचं शेतात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.