• Tue. Aug 16th, 2022

  पावसामुळे नेरमध्ये अनेक घरांच्या भिंती पडल्या.

  ByKhandeshTimes

  Sep 1, 2021

  नेर : जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे . यामुळे शेतीलाही दिलासा मिळत आहे . मात्र , हा भिज पाऊस असल्याने मातीच्या घरात ओलावा निर्माण होऊन भिंती पडू लागल्या आहेत . तसेच घरेही गळू लागली आहेत . नेरसह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे . यामुळे शेत शिवारात पाणी साचले असून , वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे . या पावसामुळे मातीची घरे धोक्यात आली आहेत अनेक घरांना गळती लागून संसारोपयोगी साहित्य ओले झाले आहे . अनेकांच्या भिंतीही पडून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे . प्लास्टिक कागद व पत्रे लावून तात्पुरता आडोसा करीत आहेत. यात नुकसान भरपाई मिळत नसल्याने नागरिकांना स्वत : च संसार उभा करावा लागत आहे . आताही अनेकांचे नुकसान झाले असले तरी पंचनामा करून नुकसान भरपाई मिळेल , याची खात्री नाही , अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे . त्यामुळे शासनानेही मदतीचा हात पुढे केला पाहिजे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.