पिंप्राळ्यातील माऊली टपरी फोडून चोरी करणाऱ्यास केली पोलिसांनी अटक.

शेअर करा.

१४ ऑगस्ट रोजी पिंप्राळा परिसरात भवानी मंदिराच्या मागे असलेल्या माऊली पानटपरी फोडून १० हजारांच्या रोकडसह २७ हजारांच्या वस्तू लांबवल्या गेल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी इस्माईल शेख सय्यद ( वय १ ९ , रा . पिंप्राळा हुडको 1 ) यास अटक केली आहे . पिंप्राळा परिसरातील तलाठी ऑफिसजवळ काशिनाथ रामजी ठाकूर ( वय ८४ ) यांची पानटपरी आहे . १४ ऑगस्ट रोजी ठाकूर सकाळी त्यांची पानटपरी उघडण्यास आले असता , टपरीच्या मागील पत्रा कापून मुद्देमाल लांबवल्याचे समोर आले होते . याप्रकरणी ठाकूर यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली होती . चोरलेला माल पिंप्राळा हुडको परिसरात विक्री केल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली . त्यानुसार पोलिसांनी ईस्माईल शेख यास अटक केली .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply