पिंप्राळ्यात चोरी करणारी अल्पवयीन मुलांची टोळी पोलिसांच्या ताब्यात.

जळगाव : पिंप्राळा व परिसरात एकाच रात्री पाण्याची मोटार , वेल्डिंग मशीन लांबवून पानटपरी फोडणाऱ्या अल्पवयीन मुलांना रामानंदनगर पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले . या तीन मुलांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . याप्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलिसात गुन्हा गावरानाभाने

पिंप्राळ्यातील मयूर कॉलनीतील स्वप्रिल मनोजसिंग परदेशी यांच्या घरातील पाण्याची मोटार ११ ऑगस्ट रोजी लांबविण्यात आली होती . त्यानंतर त्याच दिवशी पिंप्राळा हुडको येथील वेल्डिंग काम करणारे मोमीन शेख यासीन शेख यांची वेल्डिंगची मशीन लांबविण्यात आली . त्याशिवाय माऊली पण सेंटर नावाची टपरी फोडून त्यातील साहित्य व रोकड चोरी झाली होती . पानटपरी फोडून त्यातील साहित्य चोरट्यांनी पाच हजार रुपयात विक्री केले होते . ज्या व्यक्तीकडे हे साहित्य विक्री केले त्याच्याकडून ते जप्त करण्यात आले आहे . या गुन्ह्यात आणखी एका मुलाचा सहभाग आढळून आलेला आले

Leave a Reply

Your email address will not be published.