पीत्याला वाचवण्यासाठी, दुचाकीवर मुलीने गाठला १०० किमीचा प्रवास

शेअर करा.

नागद ( जि . औरंगाबाद ) : शेतकरी असणाऱ्या पित्याला अचानक अर्धांगवायूचा झटका आला . परंतु धाडसी आरतीने घाबरून न जाता दुचाकीवर पित्यास बसवून आईला पाठीमागून घट्ट पकडायला लावले औट्रम घाटसमान खडतर प्रवास करून तिने जवळपास १०० किमी अंतर पार केले व औरंगाबादमधील रुग्णालयात दाखल केले .

आरतीने त्याप्रसंगी दाखवलेली धाडसी वृत्ती यामुळे तिच्या वडिलांचा प्राण वाचला . आरतीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे नागदपासून जवळ असलेल्या जामडी ( ता . चाळीसगाव , जि . जळगाव या ठिकाणीचे शेतकरी संजय परदेशी यांना २ मुली आहेत . त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे . यामुळे घरात आता फक्त परदेशी त्यांची पत्नी आणि मुलगी आरती हे तिघेच राहतात .

आरती ही राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये बारावीत शिकत असून चार दिवसांनी आधी संजय परदेशी यांना अर्धांगवायूचा झटका आला . यामुळे त्यांची पत्नी आणि आरती है काळजीत पडले . त्यांना तत्काळ रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे असल्याने तसेच वाहनाची व्यवस्था देखील नसल्याने आरतीने दुचाकीवर वडिलांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला तिने तात्काळ वडिलांना दुचाकीवर बसवून पाठीमागे आईला त्यांना घट्ट धरून बसण्यास सांगितले व औरंगाबादकडे प्रवास सुरू केला . जामडीपासून औरंगाबादचे अंतर हे जवळपास शंभर किलोमीटरचे .. रस्ता हा देखील अत्यंत खराब … यात आजारी वडिलांसह ट्रिपल सीट प्रवास सोपा मुळीच नव्हता .पर्यंत , आरतीने हिंमत न हरवता साडेतीन तासात औरंगाबाद गाठत खासगी रुग्णालयामध्ये वडिलांना दाखल केले .

वेळेवर उपचार प्राप्त झाल्याने वडिलांचा जीव वाचल्याचे डॉक्टरांनी कळविले आहे . आरतीने दाखविलेल्या धाडसाबद्दल राष्ट्रीय विद्यालयात आरतीचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव अर्जुन पाटील , प्राचार्य बी.एस. साळवे , बी.टी. जगताप , पी.एन. पवार शेखर पाटील , प्रशांत पाटील , चव्हाण गायकवाड , दीप्ती पाटील आदींची उपस्थिती होती .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply