• Tue. Aug 16th, 2022

  पूराच्या पाण्यात पुल गेला वाहून मग काय झाले!

  चाळीसगाव तालुक्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर नदीला पूर आल्याने पुराच्या पाण्यात वाघळी ( ता . चाळीसगाव ) गावातील चांभार्डी गावाकडे जाणारा पूल वाहून गेला . त्यामुळे दोन्ही गावांचा सध्या संपर्क पूर्णपणे तुटला आहे . पुराच्या पाण्याचा फटका नदीलगतच्या शेतांनाही बसला आहे . त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडून नुकसाभरपाईची मागणी होत आहे

  यापूर्वी वाघळी गावातून चांभार्डी गावाकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता . त्यामुळे नदीपात्रातून ग्रामस्थांना जावे लागत होते . सुमारे चार वर्षांपूर्वी नदीपात्रात पूल उभारण्यात आला . तितूर नदीला सोमवारी आलेल्या पुराचा जोर एवढा होता , की पाण्याच्या प्रवाहात संपूर्ण पूलच वाहून गेला . या पुलाच्या पलीकडच्या भागात वाघळी गावातील सुमारे दोनशे घरांची इंदिरानगर वस्ती वसली आहे . पूल वाहून गेल्यामुळे चांभार्डीकरांसह वस्तीतील रहिवाशांचा संपर्क तुटला आहे . परिणामी , ग्रामस्थांना चार किलोमीटरच्या फेरा पडत आहे . पुलाच्या पलीकडे वाघळीतील बऱ्याच शेतकऱ्यांची शेती असून त्यांची गुरेही शेतातच आहेत . पुल तुटल्याने आज सकाळी शेतकर्यांना शेतातच जाता आले नाही . त्यामुळे वाघळी गावात दररोज आणले जाणारे दूध आणता आले नाही . पुराच्या पाण्याचा जोर इतका तीव्र होता , की ज्यामुळे पुलासह पुलाचा भरावही वाहून गेला .

  पुराचे पाणी नदीपात्रालगतच्या शेतात शिरल्याने बर्याच शेतकर्यांच्या कपाशीचे अतोनात नुकसान झाले . आजही शेतातील पाणी कमी झालेले नव्हते . कपाशीचे पीक मुळासह वर येऊन जमीनदोस्त झाले होते . या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी , अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे . वाघळीतही नुकसान वाघळी गावातील धनगर समाज मंगल कार्यालयाची संरक्षण भिंतही पाण्याच्या प्रवाहात तुटली . तितूर नदीकिनारी असलेल्या सुमारे १५ घरांमध्ये नदीचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे घरातील सर्व साहित्यांचे नुकसान झाले . ही घरे सिमेंट काँक्रिटची असल्याने वाचली , मातीची राहिली असती तर आणखीन मोठे नुकसान झाले असते .

  Leave a Reply

  Your email address will not be published.