• Tue. Aug 16th, 2022

    पॅरा ऑलिंपिक मध्ये खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी.

    समाज म्हणून आपण अजून मानत असतो की एखादे विशेषांगित्व असलेली व्यक्ती कमी कार्यक्षम असते . पण आपली ही विचारसरणी चुकीची आहे , असे उदार ज्यांचा पुढील चित्रपट कलंक हा विशेषांगित्वाभोवती असलेल्या स्टीगमाया विषयावर आहे.ते फिल्ममेकर नीला माधव पांडा.टोकियोत नुकत्याच समाप्त झालेल्या पॅरा ऑलिंपिकमधील भारतीय चमूच्या विक्रमी पदके मिळवणाऱ्या कामगिरीकडे निर्देश करून म्हणतात . त्यांचा विश्वास हा आगामी चित्रपट विशेषांगित्वाविषयी समाजात असलेल्या गैरसमजुतींना आव्हान देणारा असेल . खरेच , टोकियो पॅरा ऑलिंपिकमध्ये भारतीय चमूने आजपर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दोन सुवर्ण , पाच रौप्य व तीन कांस्य पदके मिळवून दहा पदके पटकावली , विक्रमही प्रस्थापित केले आहेत व्हील चेअरमधील टेबल टेनिसपासून भालाफेकसारख्या मैदानी खेळातही आपल्या पॅरा खेळाडूंनी प्राविण्य मिळवले . पदके मिळवली . म्हणजेच विशेषजनांना योग्य संधी , साधन सुविधा व विशेषजन सुलभ वातावरण दिल्यास ते कुठेच कमी पडत नसल्याचे सिद्ध झाले दुर्दैवाने आपल्या देशात विशेषजन सुलभ व साहाय्यभूत साधन – सुविधांच्या अभावामुळे अनेक विशेषजन अशा संधींना मुकतात.काहीवेळा तर साध्या – साध्या गोष्टी म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील जागा अथवा रहदारी या गोष्टीही विशेषजन सुलभ नसतात . यामुळे अनेक विशेषजनांना बऱ्याच संधींना मुकावे लागते . २०११ च्या जनगणनेप्रमाणे आपल्या देशात २.६८ कोटी जनता विशेषांगी म्हणून नोंद झाली आहे यात २० % लोकांना संचाराची अक्षमता तर १ ९ % जणांना दृष्टीहीनता होती .२०११ मध्ये आलेल्या नव्या विशेषजन हक्क कायद्यामध्ये विशेषजनांची यादी ७ वरून २१ वर गेली.म्हणजेच वरील आकडा येत्या जनगणनेमध्ये बराच वर गेलेला असेल . तरी २०१५ मध्ये मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारने आणलेली अॅक्सेसिवल इंडिया ‘ ही सार्वजनिक क्षेत्रातील प्रवेश सुलभतेची योजना रहदारी , सार्वजनिक जागा , आयटी साधन – सुविधा मोठ्या प्रमाणात विशेषजन सुलभ करण्यास असमर्थ ठरली . गोव्यासारख्या राज्यात तर सरकारी इमारती , सरकारी खात्यांच्या बहुतेक वेबसाईट , पार्क , समुद्र किनारे विशेषजन सुलभ करण्याच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या . व्हीलचेअरवाल्या विशेषजनांसाठी निदान आपल्या बसस्टैंड – टू- बसस्टैंड अशी वस प्रवास सुविधा सुरू करण्याच्या बाबतीत सरकारी कदंब महामंडळ केवळ घोषणा व नंतर सववीच देत असते . मागील जनगणनेप्रमाणे सुमारे ४५ टक्के विशेषजन अशिक्षित , ३६ टक्के नोकरी – व्यवसाय करणारे . म्हणजेच विशेषजनांच्या सवलीकरणाच्या गोष्टी केवळ हवेतच विरत असतात , असे खेदाने म्हणावे लागते . आपल्या गोवा राज्यात काही वेगळे चित्र नाही . येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धामध्ये २००५ ते २०१२ दरम्यान पदके मिळवणारा गोव्याचा पॅरा जलतरणपटू व तिरंदाज मंगेश कुट्टीकर अजून राज्य सरकारशी त्याला मिळायला हव्या असलेल्या रोख इनामांसाठी झगडतो आहे .

    Leave a Reply

    Your email address will not be published.