पेट्रोलच्या दरांमध्ये मोठ्याप्रमाणात बदल होण्याची शक्यता, जाणून घ्या काय होणार बदल.

शेअर करा.

नवी दिल्ली । रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती या आकाशाला पोहोचल्या आहेत . कालच्या दिवशी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर पोहोचले . अशा स्थितीचा त्याचा परिणाम भारतात मागील अडीच महिन्यांत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल – डिझेलच्या दरामध्ये वाढ केलेली नाही . यासारख्या परिस्थितीत आता उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपताच तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता बळावली आहे . मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाची किंमत हि प्रति बॅरल 103 डॉलर्सवर पोहोचली आहे . या आधी 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत $ 100 च्या वर गेली होती .

 

दरांमध्ये होणार हे बदल

 

3 नोव्हेंबरपासून देशाच्या अंतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही . परंतु तेव्हापासून कच्चे तेल प्रत्येकी बॅरल $ 20 पेक्षा महाग झालेले आहे . तज्ञांचे अनुसार , जर रशिया युक्रेन युद्ध दीर्घकाळ चालले तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 120 पर्यंत जाण्याची शक्यता आहे .

 

या परिस्थितीत देशांतर्गत तेल कंपन्या डिझेल व पेट्रोलचे दर प्रति लिटर 15 रुपयांनी वाढवू शकतात . ही वाढ अचानकपणे एकाच वेळी न करता दोन – तीन टप्प्यांत केली जाण्याची वर्तविली जात आहे . नैसर्गिक वायूच्या किंमती मध्ये देखील वाढत आहेत . त्यामुळे येणार काही दिवसांत LPG आणि सीएनजीच्या दरात देखील 10 ते 15 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे .

 

उत्तर प्रदेश व पंजाब सोबत 5 राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तेल कंपन्यांचे दर वाढवतील , असे बाजारांमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे . 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर केला जाणार आहे . निवडणुकीच्या काळामध्ये तेल कंपन्या पेट्रोल – डिझेलचे दर वाढवत नाहीत , असे चित्र नेहमी प्रमाने आढळून येत असे . भाव वाढल्याने सरकारचे राजकीय होऊ शकते .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply