• Tue. Aug 16th, 2022

  पैशांच्या पाऊस पडेल या आशेने महिलेचा घेतला बळी

  ByKhandeshTimes

  Dec 21, 2021

  जळगाव : शिरागड येथे मंत्रोपचाराचे नावाखाली महिलेचा बळी दिल्याचा धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे . माया दिलीप फरसे ( वय ५१ , रा . क्रांती चौक शिवाजी नगर , जळगाव ) असे या मृत महिलेचे नाव आहे . याप्रकरणी पोलिसांनी संतोष रामकृष्ण मुळीक वय ३० , रा . शिवाजी नगर ) या मांत्रिकासोबत मयताचा चुलत भाचा अमोल रतनसिंग दांडगे २७ , रा . शिवाजी नगर ) या दोघांनाही ताब्यात घेतले आहे . जळगाव तालुक्यामध्ये विदगाव येथे तापी जवळच्या जंगलात जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आलेला आहे ही महिला शिवाजी नगरामधील सारथी पापड कारखान्याला कामाला होती .

  १५ रोजी सकाळी ती कामाला गेल्यानंतर घरी परत न आल्याने दुसऱ्या दिवशी पती दिलीप रुपचंद फरसे यांनी शहरातील पोलीस ठाणे गाठून हरविल्याची तक्रार दिली होती . तिचा शोध घेत असताना शिवाजी नगरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना माया या त्यांचाच चुलत भाचा अमोल दांडगे यांनसोबत जाताना दिसून आल्या . हे फुटेज पतीला दाखविले असता त्यांनी दोघांना ओळखले असल्याचे कळाले आहे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.