• Tue. Aug 16th, 2022

  पॉप – अप फटाक्याने घेतला तीन वर्षाच्या मुलाचा प्राण, पालकांसाठी सावधानतेचा इशारा.

  ByKhandeshTimes

  Nov 6, 2021

  सूरत : दिवाळीच्या शुभ परवाला एक वाईट बातमी समोर आलीये . दिवाळीच्या सणाला आई वडिल आपल्या मुलांसाठी विविध प्रकारांमधील फटाके आणतात व त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतात . परंतु सुरतमध्ये एक वाईट घटना घडली असल्याचे आली आहे . सुरतच्या डिंडोलीत ३ वर्षांच्या मुलानं पॉप – अप फटाके खाल्ले असल्याची घटना घडली . अतिसार तसेच उलट्यांचा त्रास होऊन मुलाची प्रकृती ही गंभीर झाली . यानंतर त्याला उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले . रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत असे घोषित केलं .

   

  या प्रकरणावरून पालकांनी सावधानता पाडावी असे या घटनेवरून दिसते, त्याच्या वडिलांनी सुरतच्या डिंडोली येथे आपल्या 3 वर्षाच्या मुलाकरिता फटाके आणले होते . मूल लहान असल्याकारणाने हे फटाके फोडून झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं . त्यानंतर मुलाने फटाखा गिळला व तो आजारी पडला व बरा झाला नाही . अतिसार आणि उलट्यात पॉप – अप फटाके फुटल्यानं त्याला पुढच्या उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं . त्या ठिकाणी डॉक्टरांनी मुलाला मृत असे घोषित केलं . त्याचबरोबर सर्व पालकांनी दिवाळीच्या फटाक्यांपासून आपल्या मुलांना सांभाळून व सावधानी बाळगण्याचे आवाहन डॉक्टरांनी केलं आहे .

   

  राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे , ते कुटुंबासह 8 महिना आधी बिहारहून सुरतला आले होते . राज शर्मा यांचा पत्नी , 3 वर्षांचा मोठा मुलगा शौर्य आणि 2 वर्षांची मुलगी याप्रकारे त्यांचा परिवार आहे . 24 तासांपासून शौर्य अचानक आजारी पडला असल्याने त्यांना त्याची काळजी वाटत होती . त्याला उपचाराकरिता जवळच्या डॉक्टरांनाही दाखवण्यात आले . अचानक मुलाला उलट्या होऊ लागल्याने त्याला परत डॉक्टरांकडे नेण्यात आलं . यावर डॉक्टरांनी त्याला ड्रिप लावून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला . सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी शौर्यला मृत असे घोषित केलं .

  Leave a Reply

  Your email address will not be published.