पोटाची खळगी भरण्यासाठी तो ओढतो चक्क केसांनी कार

शेअर करा.

ब्राह्मणपुरी : आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आजही काही भटक्या जमातीतील नागरिक जीवाची बाजू मांडत विविध कसरती करताना दिसत आहेत . सारंगखेडा येथील रसीद सय्यद असाच गेल्या २० वर्षापासून कसरतीचे अनोखे खेळ करीत असून , केसांनी कार ओढण्याची कसरत करून तो प्रेक्षकांना थक्क करीत आहे . पाठीवर बि – हाड घेऊन भटकंती करणारे हे भटक्या जमातीतील नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी जाऊन कसरतीचे खेळ दाखवतात . त्यात केसांना कार बांधून , दातांच्या सहाय्याने दगड उचलणे , अशा जीव धोक्यात घालून कसरती करत असतात . काळजाचा ठोका चुकविणारे त्याचे हे खेळ उपस्थितांच्या टाळ्यांची दाद मिळवून जातात . बक्षीसरूपी पैसे व शाबासकीही मिळते मात्र , त्यांच्या भवितव्याचे काय , असा प्रश्न खेळ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो . आणि प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडतो .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply