पोलिसांना आला संशय मग काय गाडीची ताडपत्री खोलून पाहिल्यावर झाले थक्क !

शेअर करा.

शिरपूर : मुंबई – आग्रा महामार्गावर सांगवी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना सेंधव्याकडून येणाऱ्या एका कंटेनरला थांबवून त्यात २० म्हशी दाटीवाटीने व निर्दयतेने बांधलेल्या मिळून आल्या . म्हशींसह २६ लाखाचा कंटनेर जप्त करण्यात आला आहे . ९ रोजी संध्याकाळी ५ वाजता सांगवी येथे पोलीस असे महामार्गावर गस्त घालत असताना एका खबऱ्यामार्फत जनावरे भरलेला कंटनेर जात असल्याची माहिती देण्यात आली . त्यामुळे पळासनेर गावाजवळील अन्नपूर्णा हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचला आणि सेंधव्याकडून गाडी येत असताना ती पोलिसांनी अडविली . सुरुवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली . मात्र , पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी ताडपत्री उघडून पाहिले असता त्यात दाटीवाटीत , पाय दोरीने आखूड बांधलेल्या २० म्हशी दिसून आल्या . चालक ताहिर असलम खान याच्याकडे जनावरे वाहतुकीचा परवाना नसताना सदर म्हशी मालेगाव येथे घेऊन जात असल्याचे सांगितले कंटनेरमध्ये ६ लाखाच्या २० म्हशी व २० लाखाचा कंटनेर असा एकूण २६ लाखाचा मुद्देमाल सांगवी पोलिसांनी जप्त केला विनापरवाना मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात वाहतूक करून नेताना मिळून आल्यामुळे चालकाविरोधात भारतीय प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याचा कायद्याप्रमाणे सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply