पोलिसांनी जप्त केले दीड लाखांचे स्पिरीट.

धुळे : दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे स्पिरीट पोलिसांनी जप्त केल्याची घटना शनिवारी पहाटे शिरपूर तालुक्यातील तेल्यादेव गावाजवळ घडली . पोलिसांनी सात ड्रममधून एक लाख ४० हजार रुपये किमतीचे १४०० लिटर स्पिरीट जप्त केले आहे . संशयित आरोपी फरार झाला असून , त्याच्याविरुद्ध शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

शिरपूर तालुक्यातील मुंबई आया राष्ट्रीय महामार्गावरील सुळे शिवारातील तेल्यादेव गावाजवळ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास विना क्रमांकाच्या पिकअप वाहनातून बनावट दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे स्पिरीटने भरलेले ड्रम चोरटी विक्री करण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली . त्या अनुषंगाने एक पथक तयार करून सुळे शिवारात सापळा लावण्यात आला . त्याच परिसरात विना क्रमांकाची पिकअप व्हॅन उभी असून , त्यातून स्पिरीट भरलेले प्लास्टिकचे ड्रम उतरविले जात असल्याचे आढळून आले . मात्र , पोलीस येत असल्याचे पाहून संशयित राकेश जैन हा ड्रम सोडून पिकअप व्हॅनसह पळून जाण्यात यशस्वी ठरला . त्या ठिकाणावरून पोलिसांनी स्पिरीटने भरलेले ७ ड्रम जप्त केले आहे. त्यात एका ड्रममध्ये २०० लिटर प्रमाणे १ हजार ४०० लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले . त्याची किंमत १ लाख ४० हजार रुपये इतकी आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.