पोलीस शिपाई भरती परीक्षेत व्हाट्सअप च्या सहाय्याने पेपर सोडवण्याचा प्रयत्न वाचा संपूर्ण बातमी.

जळगावात पोलीस भरती परीक्षेचा काल लेखी पेपर होता . यामध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा पेपर केंद्रात व्हॉट्सअॅपच्या सहाय्याने सोडविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या परीक्षार्थी तरुणाला रंगेहात पकडण्यात आलेले आहे. याप्रकरणी कॉपी करणाऱ्या तरुणासोबत त्याला मदत करणाऱ्याविरुद्ध धरणगाव पोलिसा स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व दुसरा गुन्हा हा जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे .

 

पोलिस शिपाई भरती २०१ ९ च्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे . यात जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर १२८ पदांसाठी काल ९ ‘ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जळगाव आणि भुसावळ शहरातील ६८ केंद्रांवर २१ हजार

६९० उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी लेखी परिक्षा घेण्यात आली होती. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही हे परीक्षा केंद्र असून. येथे योगेश रामदास आव्हाड ( रा . पांझनदेव , पोस्ट . नागापूर जि.नांदगाव ) या परीक्षार्थी असलेल्या तरुणाने परीक्षा केंद्रामध्ये नजरा चुकवत मोबाईल घेऊन आला होता . योगेशने याने व्हॉट्सअॅपच्या सहाय्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो आपल्या एका मित्राला पाठवली .यानंतर त्याच्या मित्राने प्रश्नांची उत्तर सोडवत त्याला पाठवायला सुरुवात केली . हा संपूर्ण प्रकार सपोनि देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ योगेशला परीक्षाकेंद्राच्या बाहेर नेऊन चौकशी करण्यात सुरुवात केली . याप्रकरणी योगेश रामदास आव्हाड व त्याचा मित्र ( नाव निषपन्न नाही ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे . यादरम्यान , जळगांव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुल , जळगांव येथील परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी असलेले उमेदवार प्रतापसिंग गुलचंद बालोद बैठक क्रमांक ७२१७०५ ९ हा परीक्षेत गैरप्रकार करत असतांना आढळून आला आहे . सदरहू परीक्षार्थीवर देखील गुन्ह्याची नोंद करण्याच्या अनुषंगाने याबाबतची कार्यवाही ही सुरु आहे .

 

परिक्षा केंद्रावर मोबाईल त्याच बरोबर आक्षेपार्ह वस्तूंना संपूर्ण होती बंदी परिक्षा केंद्रावर पेन , पेन्सील , रबर , प्रवेशपत्र आणि शासकीय कामकाजाकरिता ग्राह्य असलेले फोटोचे “ ओळख प्रमाणपत्र फक्त इतक्या वस्तु उमेदवारांनी आणने अपेक्षित होते . मोबाईल , आक्षेपार्ह या वस्तुंना बंदी घातलेली होती . या वस्तु परीक्षा केंद्रावर आणल्यास उमेदवारांना परीक्षेत बसू देणार नाही व त्यासाठी अपात्र ठरवण्यात येणार होते . जळगांव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर १२८ पोलीस शिपाई पदांच्या रिक्त असलेल्या पदांसाठी राबवण्यात आलेली आहे . पोलीस शिपाई भरती २०१ ९ यामधील आवेदन अर्ज सादर केलेल्या एकत्रित २१६ ९ ० उमेदवारांसाठी जळगांव आणि भुसावळ शहर या ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर पोलीस शिपाई भरती २०१ ९ साठी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेली होती . सदरहू परीक्षेचा पेपर हा सकाळी ११.०० वाजता सुरु करण्यात आला आणि दुपारी १२.३० वाजता पार पाडण्यात आला .

 

लेखी परीक्षेसाठी बोलाविले गेलेले आलेल्या एकुण २१६ ९ ० उमेदवारांपैकी फक्त ११५३६ उमेदवार हे लेखी परीक्षेसाठी हजर होते व १०१५४ उमेदवार लेखी परीक्षेकरिता गैरहजर होते . सदरहू परीक्षेकरीता ५३.१८ टक्के इतके उमेदवार परीक्षेला हजर होते . अंदाजान पेपर आटोपल्यानंतर २ तासांनतर दिनांक ० ९ ऑक्टोबरचा रोजी परीक्षेची उत्तर तालिका जळगांव जिल्हा पोलीस दलाचे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे . सदरहू परीक्षेच्या उत्तरतालिकेबाबत काही प्रमाणात हरकती आक्षेप असल्यास प्रभारी पोलीस उपअधीक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९ ५५२५१००६१ व पोलीस भरती मदत कक्षाचाया हेल्पलाईन नं

०२५७-२२३३५६९ वर हरकती / आक्षेप असल्यास पाठविता आज सकाळी ० ९ .०० वाजेपर्यंत पाठविता येऊ शकतील . किंवा जळगांव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या ईमेल आयडी sp.jalgaona mahapolice.gov.in वर पाठविता येतील .

 

सदर परिक्षेचा निकाल हा जळगांव पोलीस दलाचे संकेत स्थळावर दिनांक १०/१०/२०२१ जाहीर करण्यात येणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.