प्रधानमंत्री मातृ वंदना योजना : पहिल्या अपत्यासाठी मातांना मिळणार पाच हजार रुपये !

शेअर करा.

जळगाव : आता पहिल्या अपत्यासाठी गरोदर महिलांनी तातडीने नोंदणी करून घेणे आवश्यक आहे कारण प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत जिल्हाभरात १ ते ७ सप्टेंबर दरम्यान मातृ वंदना सप्ताह राबविला जाणार असून या सप्ताहात विविध कार्यक्रमांची आखणी जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे . यात पहिल्या अपत्यासाठी मातांना तीन टप्यांमध्ये ५ हजार रुपयांची मदत मिळणार आहे . यात गरोदर महिलांना कोविड लसीकरण करून घेण्यावरही भर दिला जाणार आहे . शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळून सर्वांनाचा या योजनेचा लाभ मिळणार आहे . या नोंदणी साठी या सप्ताहाता विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply