प्रसूतीनंतर महिलेचा अचानक मृत्यू ; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप.

यावल तालुक्यातील माहेर असलेल्या विवाहितेची ६ सप्टेंबर रोजी प्रसूती झाली . यानंतर लागलीच तिची प्रकृती बिघडल्याने सोमवारी तिला जळगावातील रुग्णालयात हलवण्यात आले . काही तासातच या महिलेचा मृत्यू झाला . दरम्यान , प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप परिवाराने केला आहे .

* जन्म दिलेल्या मुलीची प्रकृती चांगली

महिलेने जन्म दिलेल्या मुलीची प्रकृती ठणठणीत आहे . मोनाली विपीन माले असे मृत महिलेचे नाव आहे . मोनाली हिची दोन वर्षांपूर्वी पहिली प्रसूती सामान्य झाली होती . या वेळी तिने एका मुलीस जन्म दिला . तर ६ रोजी यावल येथील आई हॉस्पिटलमध्ये दुसरी प्रसूती झाली .

* प्रसूतीनंतर तिची प्रकृती होती चांगली. रात्री अचानक झाली खराब

ही प्रसूती सिझेरीयनने होऊन मुलीस जन्म दिला दरम्यान , प्रसूतीनंतर तिची प्रकृती चांगली होती . रात्री तिने पतीसह अनेक नातेवाइकांशी फोनवरून गप्पादेखील मारल्या . मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून तिची प्रकृती खराब झाली . काही तासातच अत्यवस्थ झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला जळगावच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले . उपचार सुरू असताना दुपारी १.३० वाजता तिचा मृत्यू झाला . रात्री आनंदात असलेल्या मोनालीची अचानक प्रकृती बिघडल्याने दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला .

* परिवाराचा आरोप :प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांनी केला हलगर्जीपणा

प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळेच मोनालीचा मृत्यू झाल्याचा आरोप पती विपीन विनायक माले यांनी केला आहे . सोमवारी सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला . याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात.

Leave a Reply

Your email address will not be published.