प्रेमभंगाच्या दुःखातून तरुणीने केली आत्महत्या,कागदावर 200 वेळा लिहिले ‘ आशिष लव वैशाली ‘.

मुरादाबाद : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादी येथील तीर्थंकर महावीर विद्यापीठामध्ये MDS करत असलेल्या डॉ . वैशाली चौधरी यांनी तिच्या हॉस्पिटलच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक अशी घटना घडल्याचे समोर आले . पोलिसांना तिच्या खोलीमध्ये एक चिठ्ठी सापडली . या ठिकाणी सापडलेल्या या चिठ्ठीत जवळपास दोनशे वेळा ‘ आशिष लव्ह वैशाली ‘ असं लिहिले असल्याचे कळाले आहे . मुख्यतःकोणत्या कारणावरुन वैशालीने आत्महत्या केली याबाबतचा शोध पोलीस घेत असून मृत्यूसंदर्भात पोलिसांनी दोन डॉक्टर आशिष जाखर व समर्थ जोहरी यांनविरोधात गुन्हा दाखल केल्याचे कळाले आहे .डॉ . आशिष जाखड व वैशाली हे MBBS चे एकत्र शिक्षण घेत होते . या काळामध्ये त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं . दोघांनी देखील एकमेकांसोबत लग्न कऱण्याचाही निर्णय घेतला परंतु MBBS कम्प्लीट झाल्यानंतर डॉ . आशिष हा दिल्लीला निघून गेला व डॉ . वैशाली MDS करू लागली .

 

दिल्ली गेल्यानंतर डॉ आशिष आपलं दिलेलं वचन विसरला ही वैशालीची तक्रार होती . याकरिता ती अनेकदा आशिषला भेटण्याचा प्रयत्न करत होती , परंतु आशिष तिला टाळत असल्याचं सांगितलं जातं . या संपूर्ण प्रेमभंगाच्या दुःखातूनच तिने आत्महत्या केली , असा प्राथमिक संशय व्यक्त केला जातो आहे . आत्महत्येच्या आधीच्या रात्री वैशाली ही हॉस्टेलमध्ये आली नव्हती . दुसऱ्या दिवशी सकाळी रूमवर आल्याच्या नंतर गळफास लावून तिच्या आयुष्याला शेवटचा विराम दिला . पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत , या प्रकारांना संबंधित जो निर्णय समोर येईल त्याच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल .

 

एका कागदावर जवळपास 200 वेळा लिहिले ‘ आशिष लव वैशाली ‘ वैशालीच्या खोलीची तपासणी केल्या असता पोलिसांना एका रजिस्टरमधून एक कागद सापडला . हा कागद फॉइलने झाकून ठेवण्यात आलेला होता , ज्यावर ‘ ashish love vishali ‘ असे सुमारे दोनशे वेळा लिहिले असल्याचे कळाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.