प्रेमीयुगुलाने गावाजवळच्या पुलावरून मारली उडी काय घडला प्रकार वाचा सविस्तर बातमी.

शेअर करा.

शिरपूर : सावळदे गावाजवळच्या पुलावरून तापी नदीच्या पात्रात शनिवारच्या सकाळी एका विवाहित असलेल्या प्रेमीयुगुलाने स्वतःला झोकून दिले व कायमचे ‘ एक दुसऱ्यासाठी होण्याच्या बेताने प्रयत्न केला . यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणीला वाचवण्यामध्ये स्थानिकांना यश मिळाले. अमोल गोटू कोतकर ( ३२ , रा वारुड , हल्ली करवंद नाका , शिरपूर ) आणि दर्शना येवले ( ३० , रा नाशिक ) ही त्यांची नावे आहेत .

 

घडलेल्या घटनेच्या ठिकाणी आधीच स्थानिक लोक पाण्यामध्ये गरताड ( ता शिरपूर ) येथील २३ वर्षीय ऋषिकेश राजेंद्र पाटील ह्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यात व्यस्त होते . त्याचवेळी ही घटना घडतांना दिसून आली. त्यामुळे तात्काळ मदत मिळाली . पोहण्यात माहीर असलेले नारायण गोपीचंद कोळी , श्रीराम गोपीचंद कोळी , कैलास नारायण कोळी , उत्तम सुका कोळी यांनी दोघांना वाचवण्याकरिता प्रयत्न केला ; परंतु तरुण हा हाती लागला नाही तर विवाहित तरुणीला पाठवण्यात यश आले आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply