फटाक्यांवर बंदी नाही, राज्यामध्ये दिवाळी फटाक्यांच्या सोबत होणार साजरी!.

मुंबई : कोरोना चा या कठीण काळातून हळूहळू राज्य बाहेर येत असताना यंदाच्या दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावरती कोणत्याही प्रकारची बंदी नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे . यामुळे याबद्दलचे लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर होणार आहे . परंतु , कोरोनामुळे आजारी झालेल्या किंवा कोरोना होऊन गेले असलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो याची भीती असल्याने यावर्षी फटाके फोडण्यास टाळावे , हे आवाहन दिवाळीच्या निमित्ताने जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्य सरकारने केलेले आहे . ‘ ब्रेक द चेन या अंतर्गत असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन हे दिवाळी साजरी करताना करावयास सांगण्यात आले आहे , दिवाळी ही घरगुती स्वरूपामध्ये साजरी करावी , सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे शक्यतो टाळावे , असे राज्य सरकारने जाहीर केलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे. दिवाळी खरेदीकरिता ठिकठिकाणी बाजारांमध्ये असलेली दुकाने आणि रस्त्यांवर यामुळे होणारी गर्दी शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा . ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी घराबाहेर जाण्याचे टाळावे . मास्कचा वापर करावा आणि सामाजिक अंतर पाळावे . दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजनाच्या वेळी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे . संबंधित कार्यक्रम हे शक्यतो ऑनलाइनच घ्यावेत , असे आवाहनही सरकारने जनतेकडे केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.