• Tue. Aug 16th, 2022

    फुकट नाश्ता न दिल्या कारणाने मारहाण करणाऱ्या दोघांना अटक.

    जळगाव : फुकटचा नाश्ता न दिल्या कारणाने सिंधी कॉलनी येथे मिठाई व नमकीन विक्रेत्यास दोन तरुणांनी मारहाण केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी घडली . या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केली आहे . त्या रोजी सायंकाळी सहा वाजता या दोघांनी सिंधी कॉलनीत बबलाराम नारायणदास तलरेजा यांच्या आस्थापनेवर जाऊन शंभर रुपयांचा नाश्ता मागितला . तलरेजा यांनी आधी पैसे द्या मगच नाश्ता मिळेल असे सांगितले असता आम्ही पैसे देणार नाहीत असे सांगून तलरेजा यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर हातातील कड्याने डोक्यात व पाठीवर मारुन दुखापत केली होती . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . याप्रकरणी पोलीसांनी गुरुवारी उमेश व आकाश या दोघांना अटक केली . त्यापैकी उमेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द याआधी चार गुन्हे दाखल आहेत . दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या.ए.एस.शेख यांनी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली .

    Leave a Reply

    Your email address will not be published.