फेसबूक , व्हाटस् अँप , इंस्टाग्राम चे बंद पडले मशीन सर्वर झालेत डाऊन

मुंबई : भारतासोबत इतर अनेक देशांमध्ये व्हॉट्सअँप , फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा ही रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक पणे ठप्प पडली व्हॉट्सअॅपवरती ‘ सर्व्हर एरर ‘ या प्रकारचा संदेश दिसत होता .तर इन्स्टाग्रामवरील फीड्स या रिफ्रेश होतच नव्हते. फेसबुकच्या सर्व्हरवरील टेक्निकल बिघाडामुळे या सेवा पूर्णपणे बंद झाल्या होत्या . अनेक तास फेसबुकच्या या तीघ सेवा बंद होत्या . रात्रीच्या सव्वानऊ वाजेच्या सुमारास व्हॉट्सअॅपवरुन कोणताही मेसेज पाठविणे अचानक थांबून गेले . अनेकांना मेसेज हे मिळेनासे झालेत . तात्काळ फेसबुक देखील बंद पडले . युझर्सना फेसबुकवर त्यांच पोस्ट टाकता आल्या नाहीत. त्याच बरोबर व्हिडिओचे स्ट्रीमिंगही देखील थांबले . याच प्रकारची अडचण इन्स्टाग्रामवर देखील पाहण्यात मिळाली . अनेकांना फेसबुकवर ‘ इंटरनेट सेवा तपासून पाहा या प्रकार संदेश येऊ लागला . या घटनेनंतर नेटकऱ्यांनी द्वीटर , टेलिग्राम व सिग्नल या पर्यायी सेवांचा वापर करण्यासाठी सुरुवात केली .

Leave a Reply

Your email address will not be published.