फ्रंटलाइन वर्कर साठी बूस्टर डोस झाला रेडी.

शेअर करा.

मुंबई : सर्व शासकीय महापालिका , खासगी लसीकरण केंद्रांवर आजपासून (१० जानेवारीपासून) आरोग्य कर्मचारी , फ्रंटलाइन कर्मचारी तसेच ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीची बूस्टर डोस आता मिळणार आहेत . सर्व शासकीय , महानगरपालिका , तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन स्वरुपाची नोंदणी , तसेच थेट येऊन नोंदणी पद्धती देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत .

 

लसीचे दोघ डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी , फ्रंटलाइन कर्मचारी , तसेच ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांनी लसीची दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३ ९ आठवडे पूर्ण झाल्यावर , ते १० जानेवारीपासून प्रतिबंधात्मक मात्रा म्हणजेच बूस्टर ( प्रिकॉशन डोस ) घेण्याकरिता पात्र असतील .

 

६० वर्षे व त्यावरील। वयाच्या सहव्याधी असलेल्या घेण्यासाठी नागरिकांना मात्रा केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र दाखविण्याची आवश्यकता पडणार नाही . परंतु , अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply