नंदुरबार : चोरट्यांना आता तर के . टी . वेअरच्या लोखंडी पाट्या पण पुरेनासा झाल्या आहेत. नवापूरजवळील असलेल्या बंधान्याच्या लोखंडी पाट्या या नवापूर शहरातील तिघा चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. तिघांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे . तर , पाट्या काढून नेल्याच्या घटनेमुळे बंधारा मधील पाणीसाठा वाहून गेल्याचे दिसून आले आहे . संदीप वसंत बि – हाडे , किसू ईश्वर दुबला रा . देवळफळी , नवापूर व त्यांचा एक जोडीदार ही संशयितांची नावे असून संदीप याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे .
नवापूर निगडीत मतीमाता मंदिराजवळ रंगावली या नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा आहे . बंधाऱ्यातील पाणी अडविण्यासाठी त्याची साठवणूक करण्यासाठी या लोखंडी पाट्या लावण्यात आल्या आहेत . दहा हजार रुपयाची किंमत असणाऱ्या या चार पाट्या चोरट्यांनी चोरी केल्या आहे . त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहून गेल्याचे कळत असे. ही बाब तेथील संबधित विभागाच्या कर्मचाऱ्याला कळाल्यावर त्याची पाहणी झाली असून . त्यावेळी या तिघां चोरांनी ही चोरी केल्याचे समोर आले . याबाबत राकेश मावची यांनी फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला गेला आहे . त्यापैकी संदीप बि – हाडे यास अटक करण्यात आली असून दोघांचा शोध अजून वार सुरज आहे .