‘बदल्याच्या’भावनेने घरात घुसून केला गोळीबार वाचा संपूर्ण बातमी.

जळगाव : भावाची हत्या केल्याचा सूड म्हणून आकाश मुरलीधर सपकाळे याचा खून करण्याच्या बेताने घरात शिरूण गोळीबार केल्याची चित्तथरारक घटना गुरुवारी सकाळच्या साडेआठ वाजेच्या सुमारास कांचन नगरात घडली . याबाबत माजी महापौर अशोक सपकाळे यांचा सुपुत्र बाबू सपकाळे , सोनू सपकाळे , मिलिंद सकट , प्रद्युम्न म्हणून ओळखला जाणारा बंटी नंदू महाले , मयूर उर्फ विक्की दीपक अलोने आणि राहुल भालेराव, आकाश मुरलीधर सपकाळे , नितीन मुरलीधर सपकाळे , मुरलीधर गयभू सपकाळे व रुपेश संजय सपकाळे यांच्याविरोधात परस्परविरोधी तक्ररीनंवरून गुन्ह्याची नोंदणी करण्यात आले असून या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळाले आहे.

 

आकाश सपकाळेच्या करंगळीला एक गोळी लागून निघून गेली आहे . ४ नोव्हेंबर २०२० या रोजी अशोक सपकाळेच्या मुलाचा राकेशचा खून झाला होता . हा खून लाडू गँगचा प्रमुख असलेला आकाश सपकाळे , गणेश सोनवणे , रुपेश सपकाळे व सोनवणे तसेच महेश निंबाळकर यांनी केल्याचा आरोप केला गेला आहे . भावाच्या खुनाचा सूड घेण्यासाठी बाबू आणि सोनू सपकाळे यांनी आकाश सपकाळेला याला जिवे मारण्याची सुपारी ही विक्की अलोनेला दिलेली होती . गुरुवारच्या सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास विक्की अलोने , मिलिंद सकट , बंटी महाले या सर्वांनी आकाशच्या घरात शिरून गोळीबार केला .झटपटीमध्ये बंटी आणि मिलिंदने रिक्षाने पळून गेले तर गटारी मध्ये पाय फसल्याने विक्की हा जागेवरच पडला . यावेळी आकाश व त्याच्या इतर कुटुंबीयांनी त्याला मारहाण केली आणि यामध्ये तो बेशुध्द झाला . आकाश याने सपकाळे गटाविरुध्द व विक्की याने आकाशच्या कुटुंबियांच्या विरुध्द तक्रार दिलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.