बाप्पाचे नाव घेत आली बहिण भावासाठी, यकृत केले दान दिले नवे जीवनदान

मुंबई : सुरतला असणाऱ्या एका व्यक्तीला लिव्हर सिरोसिस आजार झाला असून . त्याचे प्राण वाचविण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे यकृताचे प्रत्यारोपण करणे हा होता .भारतात ३री लाट येण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर बंदी असताना बहीण ही गणपती बाप्पाची प्रार्थना करत अमेरिकेतून आली . बहिणीने यकृत डोनेट करून भावाला जीवनदान दिले .

 

हि शस्त्रक्रिया मुंबईतील एका खासगी रुग्णालयात पार पडली गेली .फोर्टिस हॉस्पिटलमधील लिव्हर ट्रान्सप्लाण्ट अॅण्ड एचपीबी सर्जरी सेक्शन चे सल्लागार आणि प्रमुख सर्जन डॉ . गौरव गुप्ता म्हणतात की , ‘ ही एक अनोखी केस होती . आम्हाला समजले की , रुग्णाची बहीण सुनीता गजेरा स्वताच्या इच्छेने दान करण्यास तयार आहे . तिची तपासणी करण्यात आली असून आणि तिचे व तिच्या भावाचे यकृत जुळले . दात्याला प्रवासाची व प्रत्यक्षात दान करण्यासाठीची आवश्यक अश्या सर्व परवानगी मिळवण्याची गरज होती . दाता हा अमेरिकन नागरिक असून . प्राप्तकर्ता हा भारतीय व्यक्ती होता . आम्ही लॉकडाऊन त्याचबरोबर निर्बंध असताना देखील सुनीताला प्रवासासाठीची परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले . त्यानंतर गजेराने भावाला भेट म्हणून एक नवीन जीवनदान देऊ केले .

Leave a Reply

Your email address will not be published.