बारावीच्या पेपरांमध्ये आढळत आहे अनेक चुका, या मागे नेमके कारण काय?

शेअर करा.

मुंबई : बारावी बोर्डच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून इंग्रजी विषयाच्या प्रथम पेपरमध्ये एका गुणाचा चुकीचा प्रश्न विचारला असल्याने विद्यार्थ्याचा गोंधळ उडाला .

पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंडळाच्या ध्यानात ही चूक आली व हा सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचा एक गुण दिला जाईल , असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केलेले आहे .

 

इंग्लिश च्या पेपरमध्ये चूक असल्याची तक्रार विद्यार्थी , शिक्षकांनी केली . ‘ सिम्पल सेन्टेन्स बनवा या प्रश्न करिता देण्यात आलेले वाक्य मुळातच ‘ सिम्पल सेन्टेन्स ‘ असल्याने विद्यार्थी हा प्रश्न सोडविताना गोंधळून गेले होते .

 

रतन टाटा जे नाही म्हटले , ते इंग्रजीच्या पेपरमध्ये सोशल मीडियामध्ये कोणतेही विधान हे महान व्यक्तींच्या नावे प्रसारित करण्याचा प्रकार सर्रासपणे होतो . परंतु हा प्रकार बोर्डाच्या परीक्षेतही व्हावा , हे अत्यंत आश्चर्यकारक आहे उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होणारे एक वाक्य बारावीच्या परीक्षेमध्ये देखील नमूद केल्याने गोंधळ उडाला . मंडळाच्या नियंत्रण समितीच्या लक्षात ही चुकी का आली नाही असा सवाल शिक्षण क्षेत्रातील असणाऱ्या तज्ञांनी मांडलेला आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply