बाळ तब्बल ५ लाखांना विकले तामिळनाडू live-in relation पार्टनरचे होते बाळ

शेअर करा.

मुंबई : लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या पार्टनरच्या चार महिन्यांच्या मुलीचे किडनॅपिंग करत तिची तामिळनाडूत पाच लाखांना विक्री करण्याची हडबडून लावणारी घटना व्ही . पी . रोड पोलिसांच्या हद्दीत घडून आलेली आहे . या प्रकरणा संबंधित चार दिवस तपास करत एका टोळक्याला अटक करण्यात आल्याची माहिती मंगळवारी स्पष्ट करण्यात आली . या टोळीत अपहृत बाळाच्या आईच्या मित्रासोबत एकूण ११ जणांचा समावेश आहे .

 

जानेवारी ३ रोजी बाळाला सांभाळणारी केअर टेकर अन्वरी शेख यांनी पोलीस ठाण्यात येऊन इब्राहिम शेख ( ३२ ) याने त्यांच्याकडून बाळाला किडनॅप करून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली . प्रकरण हे अत्यंत संवेदनशील असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संध्याराणी भोसले आणि विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची नियुक्ती करुण तपासाला सुरुवात करण्यात आली . या पथकाने सर्वप्रथम इब्राहिमला ताब्यात घेत त्याची जबरदस्त अशी चौकशी करत मालाड , जोगेश्वरी , नागपाडा , सायन , कल्याण , धारावी व ठाण्यात छापे टाकत २ महिला आणि ४ पुरुषांना ताब्यात घेतले .

 

बाळाला कर्नाटक , तामिळनाडूमध्ये विकणे असल्याचे त्यांनी पोलिसांना कळवले . त्या प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक दिलीप तांबे व अभिजित देशमुख यांचे पथक दोघं ठिकाणी रवाना झाले . तांबे यांनी सतत चार दिवस माग घेत तामिळनाडूच्या कोईमतूर मध्ये बाळाला ताब्यात घेतले व एका महिलेसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply