फेसबुक या आपल्या कंपनीचे नाव बदलून आत्ता मेटा करण्यामागे मार्क झुकेरबर्गची दूरदृष्टी हि नेमकी काय आहे हे आता स्पष्ट झालं आहेच . सोशल मीडियाचे आजचे रूप हे पूर्णपणे जुनाट ठरवून पार कोपयात भिरकावून देईल अशी मेटावर्स नामक नवी दुनिया आता जगासमोर खुली केली जाणार आहे .
डोळ्याला एक साधारण गॉगल (VR SET) लावून कुणीही या आभासी जगात फेरफटका मारण्याकरिता सज्ज होईल .
या दुनियेत पाय रोवण्यासाठी बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टने नुकतीच अॅक्टिव्हिजन ब्लिझार्ड की कंपनी विकत घेतलेली आहे . मोबाइल गेमिंगच्या जगातले या कंपनीचे वर्चस्व वादातीत असेच . या खरेदीसाठी मायक्रोसॉफ्टने ६८.७ बिलियन डॉलर्स रक्कम मोजली आहे .
त्याखालोखाल मायक्रोसॉफ्टचे सर्वात महागडी खरेदी असलेल्या लिक्ड इनसाठी कंपनीला फक्त २६.२ बिलियन डॉलर्स दिले गेले होते