बोदवडला जाणारी पाहिल्या बसवर दीपनगर जवळ दगडफेक.

शेअर करा.

भुसावळ : आगारातून सुटलेली भुसावळ ते बोदवड या पहिल्या बसवर दिपनगर जवळ अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना शनिवारी घडली आहे . शुक्रवारीही यावल येथेही बसवर दगडफेक करण्यात आली होती . यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर अद्यापही तोडगा निघालेला आहे . राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा केली आहे . पगारवाढीच्या घोषणेनंतरही काही आगारात एसटी बससेवा पुन्हा सुरू झाली आहे . मात्र , भुसावळ आगारातून गेल्या २० दिवसापासून बस सेवा बंद होती . https://khandeshtimes.in/

अशी करण्यात आली दगड फेक:

मात्र , अनिल परब यांनी आज अखेरचा अल्टीमेटम दिल्याने भुसावळ आगारातील सहा संपकरी एसटी कर्मचारी कामावर हजर झाले . यावेळी भुसावळ आगारातून जळगाव यावल बोदवड मार्गावर बस सोडण्यात आल्या होत्या . यावेळी भुसावळ आगारातून बोदवडकडे निघालेल्या बसवर दिपनगर नजीक अज्ञातांनी दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या आहेत . भुसावळ आगारातून बोदवडकडे निघालेल्या धावत्या बसवर रस्त्यात दिपनगरनजीक अज्ञातांनी दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या . या बसमध्ये आठ प्रवासी होते . दगडफेकीत कोणालाही दुखापत झालेली नाही . घटनेनंतर याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यानंतर बस जागेवरच थांबवण्यात आली आहे , असे या वेळी बस वाहकाने सांगितले .https://khandeshtimes.in/

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply