• Tue. Aug 16th, 2022

    भडगाव येथे बॅंकेच्या कर्मचारीनेच केली बॅंकेत चोरी, लुटला करोडोचा माल.

    ByKhandeshTimes

    Nov 23, 2021

    भडगाव : तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी आणि नागरिकांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून यात बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे . तर या प्रकरणात सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त मूल्याचे दागिने लंपास करण्याचा डाव पोलिसांनी पर्दाफाश करत उघडकीस आणली आहे . याबाबत वृत्त असे की , भडगाव तालुक्यातील आमडदे येथिल महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी व ग्राहक यांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे . अखेर या जबरी चोरीचा उलगडा होऊन पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर व त्यांच्या पोलीसानी अवघ्या तीन तासात बँक कर्मचारी व त्याच्या दोन साथीदार यांना ताब्यात घेत या जबरी चोरीचा पर्दाफाश केला आहे . या जबरी चोरीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे .

    घटना स्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक डा . प्रविण मुंडे यांनी भेट देत पोलीस अधिकारी यांना पुढील तपासा बाबत सुचना केल्या आहेत . भडगाव तालुक्यातील आमडदे येथे महाराष्ट्र ग्रामीण बक शाखा असुन येथे मॅनेजर सह तीन कर्मचारी कार्यरत आहे . २२ नोहेंबर रोजी रात्री १ ते २-३० वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण बकेत चोरी झाल्याची माहिती गावात पसरली . चोरी झाल्याची माहिती कर्मचारी यांनेच गावातील नागरीकांना दिली . यावेळी घटनेची माहिती भडगाव पोलीसाना देण्यात आली . पोलीस घटना पोहताच बकेत प्रत्यक्ष घटनास्थळी चोरी करताना चोरां कडुन बँकेचे कुलुप तोडणे , तिजोरी फोडणे , लॉकर तोडणे असा प्रकार दिसुन येत नव्हता . तसेच बँकेत असलेल्या रोकड रक्कमेला हात लावलेला नव्हता . यामुळे यात बँकेतीलच कर्मचाऱ्यांचा सहभाग असावा असा संशय प्रथमदर्शनी येत होता .

    दरम्यान , याच बँकेच्या मागे रहाणारा शिपाई राहुल पाटील यास विचारपुस करत माहिती घेतली असता व पोलीसी खाक्या पोलीसानी दाखविला असता तो पोपटासारखा बोलुला लागला . या जबरी चोरी प्रकरणी बँक शिपाई राहुल पाटील व त्याच्या अन्य दोन साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहे . यात आरोपी वाढ होण्याची शक्यता पोलीसाकडुन वर्तविली जात आहे . यावेळी जळगाव येथिल श्वान पथक पाचारण करण्यात आले होते .

    दरम्यान , भडगाव पोलीसांनी ताब्यात घेतलेला आरोपी कर्मचारी व अन्य दोन साथीदार यांना बोलत करत जबरी चोरी घटनेतील मुद्देमाल कुठे लपविला आहे याबाबत खात्री करत तिघे आरोपी पैकी एका आरोपीच्या आमडदे शेत शिवारातील जोगडा कडील शेतात व आंचळगाव रस्त्याकडील शेतात खड्डा करून लपविलेले दागिणे आरोपीनी काढुन दिले . घटनास्थळी पोलीस टीम पोलीस पोलीस अधिक्षक डा . प्रविण मुंडे , डीवायएसपी सचिन गोरे , उपविभागिय पोलीस अधिकारी कैलास गावडे , यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले . पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर , एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक , त्याचे पथक पोलीस लक्ष्मण पाटील , भडगाव सहा . फौजदार कैलास गिते , पोलीस का . विलास पाटील , स्वप्निल चव्हाण , किरण पाटील , ज्ञानेश्वर महाजन , चालक राजु पाटील करीत आहेत .

    या प्रकरणात नेमकी किती रुपयांचे दागिने चोरण्यात आले होते याची माहिती मिळाली नाही . मात्र हा आकडा दोन ते तीन कोटी रूपयांचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे .

    Leave a Reply

    Your email address will not be published.