भारतीय नौदलात २५०० जागा उपलब्ध, बारावी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी वाचा सविस्तर माहिती.

देशाच्या सेवेसाठी उपलब्ध आहे सुवर्ण संधी ,भारतीय नौदल आर्टिफिसर अप्रेंटिस ( एए ) व वरिष्ठ माध्यमिक भर्ती ( एसएसआर ) पदांकरिता पात्र असलेल्या उमेदवारांची भरती करणार आहे. या भरतीसाठी केवळ अविवाहित असलेले पुरुष उमेदवारच अर्ज करू शकतात . बॅच फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार असून या पदांकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे .

 

जाहिर केलेल्या अधिसूचनेनुसार , दहावी व बारावीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे 10,000 उमेदवारांची निवड केली जाणार आहे . उमेदवारांना लेखी परीक्षेला उपस्थित राहणे अनिवार्य आहे व शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या घ्याव्या लागणार आहे. या भरती मोहिमेद्वारे , भारतीय नौदलाने दोन्ही पदांकरिता 2,500 रिक्त जागा आणल्या आहेत , यापैकी 500 आर्टिफिसर अप्रेंटिस ( एए ) पदांसाठी व 2000 वरिष्ठ माध्यमिक भर्ती ( एसएसआर ) पदांसाठी आहेत .

 

गणित व भौतिकशास्त्र याशिवाय रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक यापैकी कोणत्याही एका विषयांना मध्ये 60 % किंवा त्यापेक्षा जास्त गुणांसह 12 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार आर्टिफिसर अप्रेन्टिस ( एए ) या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. व त्याच वेळी , गणित आणि भौतिकशास्त्र याशिवाय विज्ञान / जीवशास्त्र / संगणक विषयासह 12 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार वरिष्ठ माध्यमिक भरती ( एसएसआर ) पदासाठी अर्ज करू शकतात . या पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 1 फेब्रुवारी 2002 ते 31 जानेवारी 2005 यादरम्यान असावा .

 

इच्छुक व पात्र असलेले उमेदवार joinindiannavy.gov.in ला भेट देऊन या पदांकरिता अर्ज करू शकतात .

Leave a Reply

Your email address will not be published.