भावानेच आपल्या सख्या बहिणीच्या घरावर मारला डाका मग काय झाले !

शेअर करा.

जळगाव : सिंधी कॉलनीतील पवन हिरालाल लालवाणी यांचे घर बनावट चावीने उघडून कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरीला गेला होता . घडल्या प्रकाराचा गुन्हा दाखल होवुन पवन आणि त्याची पत्नी खुशी यांनी शालक आणि सासऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल असल्याचा संशय व्यक्त केला होता .

बहिणीच्या माहितीवरुन पोलिसांनी भाऊ भारत अनिल कुकरेजा याला अटक केली . त्याने चोरीचे सोने एका खासगी बँकेत तारण ठेवून ४५ हजार मौज मस्तीत उडवल्याची कबुली दिली आहे .पवन ललवाणी यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत घरफोडीचा गुन्हा करण्यात आला होता . दाखल गुन्ह्यात पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी स्वतः चौकशी करुन तक्रारदार पवन त्याची पत्नी खुशी या दोघांकडून माहिती घेतली .

खुशीने सख्खा भाऊ अनिल कुकरेजा आणि त्याच्या वडीलांवर अनेक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगीतले होते . त्या दिशेने तपासाला सुरुवात होऊन गुन्हा घडल्या पासून पसार असलेल्या भारत अनील कुकरेजा याचा पोलिस शोध घेत होते . उल्हासनगर व तेथून तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली . आज ( ता .२ ) गुरुवारी जळगाव शहरात येत असल्याची खात्री होताच पोलीस पथकाने घरी येताच त्याला ताब्यात घेतले असून गुन्ह्यातील लॉकेट त्याने काढून दिले . त्याने आपल्या सख्या बहिणीकडे चोरी करून भारत कुकरेजा याने चोरुन आणलेले सोने एका खासगी बँकेत थेट गहाण ठेवुन ४५ हजार रुपये घेत उल्हास नगर गाठले , मुंबई नंतर तेथून तो पुण्यात गेला ऐश मौज करण्यात त्याने सर्व पैसा उडवल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply