भुसावळ व मुक्ताईनगरात आढळले ४ नवे कोरोना बाधित रुग्ण.

जळगाव : कोरोना नाहीसा होत असलेल्या मार्गावर असताना पुन्हा कोरोना ने आपले पाय पसारले आहे पुन्हा जिल्ह्यात ४ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून भुसावळात ३ तर मुक्ताईनगरात १ बाधित रुग्ण समोर आला आहे . अन्य १३ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही . जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे . दरम्यान , जळगाव शहरात एकही रुग्ण आढळून आलेला नसून सक्रिय रुग्णांची संख्या ५ वर स्थिर आहे . तर भुसावळात रुग्णवाढ होत असून सक्रिय रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे . जळगाव ग्रामीणमध्ये एकही रुग्ण नसल्याने दिलासा आहे . यासह पाचोरा , धरणगाव , यावल , एरंडोल , बोदवड , रावेर , पारोळा या तालुक्यांमध्येही एकही सक्रिय रुग्ण नाही . जामनेर , अमळनेर , चोपडा , चाळीसगाव , मुक्ताईनगरात प्रत्येकी १ रुग्ण आहे .त्यामुळे नागरिकांना काळजी घेणे आवश्यक झाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.