भूसंपादन आणि खरेदी – विक्री व्यवहारातील अडचणी आता दूर होतील !

अमळनेर : शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर प्रदीर्घ कालावधीपासून असलेले बोजे कालबाह्य नोंदी कमी करण्याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत . यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचे शेती व्यवहार करणे सोपे होणार आहे . अनेक शेतकऱ्यांच्या शेतीवर प्रदीर्घ काळापासून तगाई बोझे , बंडिंग बोझे सावकारी बोझे रद्द झालेल्या भूसंपदनाच्या नोंदी आयटक बोझे , अस्तित्वात नसलेल्या संस्था व सोसायट्यांचे बोझे या नोंदी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी विक्री कर्ज प्रकरण , भूसंपादन मोबदला यासाठी कामकाजात अडचणी येत होत्या . तसेच शासनाकडून शेती सुधारणा साठी विहीर , तगाई , बैल तगाई , चारा तगाई , खावटी तगाई , ऑइल इंजिन तगाई , बी बियाणे तगाई परतफेड करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना हप्ते ठरवून दिले होते.त्याची नोंद शेतकऱ्यांचा सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात नोंदविण्यात आली होती.मात्र शासनाने तगाई विषयक कर्ज माफ केले आहे . याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published.