मंडळी मुलगी पहायला आले अन लागलीच लग्न लावून गेले !

शेअर करा.

जळगाव : कोरोनाचा संसर्ग आजही कायम आहे . त्यामुळे कुणाच्याही आरोग्याला धोका निर्माण होवू नये आणी कोणाला त्रास होऊ नये यासाठी कुठलाही कार्यक्रम न घेता , मुलगी पाहण्यासाठी आलेल्या वर मंडळींनी त्याच दिवशी लग्न लावून आदर्श निर्माण केला . हा स्तुत्य उपक्रम मनियार बिरादरीतर्फे राबविला . शहरातील मनियार वाडा येथील सय्यद इस्माइल हाजी मुसा यांची मुलगी हिला पहूर येथील शोएब हा पाहण्यासाठी आला होता . मुलगी पसंत पडल्यानंतर लागलीच लग्नाचा निर्णय घेण्यात आला . सायंकाळी मशिदीत निकाह पार पडला . यावेळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख , उपाध्यक्ष सय्यद चाँद अब्दुल रऊफ अब्दुल रहीम , सलीम मोहम्मद आदींची त्या ठिकाणी उपस्थिती होती

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply