मटन मिळाले नाही म्हणून पत्नीला लटकावले फाशीला.

शेअर करा.

सिल्लोड ( औरंगाबाद ): मोलमजुरी करून पोट भरत असलेल्या पत्नीकडे मटनाकरीता पैसे नसल्याने तिने जेवणासाठी पिठले केले . मटन का केले नाही म्हणून दारू पित असणाऱ्या नवऱ्याने तिला काठीने बेदम अशी मारहाण करून गंभीर जखमी केले . मारहाणीवरच न थांबता ‘ तू अजूनही मेली का नाहीस , असे म्हणून त्याने पत्नीला सरळ सरळ फासावर लटकवण्याचा प्रयत्न देखील केला .

परंतु अर्धमेल्या अवस्थेतही कशीबशी सुटका करून पळ काढून शेजारच्या घरामध्ये लपल्याने तिचा जीव वाचला ही धक्कादायक घटना रात्री सिल्लोड तालुक्यातील राहिमाबाद या ठिकाण घडली . याप्रकरणी पती नागेश शिंदे याच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . रहिमाबाद या ठिकाणी नागेश हा हमाली करतो . त्यातून मिळालेला सर्व पैसा तो दारूमध्ये पूर्णपणे घालवीत असे . त्यासाठी तो पत्नी कौशल्याबाईला मारहाण करत असे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply