मुंबई : मद्यप्रेमींसाठी खुशखबर-खुशखबर . कारण राज्य सरकारने परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या मद्यावरील विशेष शुल्क दरात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय चालूच स्थापित केला आहे . उत्पादन शुल्क विभागाने नियम बदलल्यामुळे काही ब्रँडचे दर कमी झाले आहेत . व्हिस्की , रम , ब्रँडी , जिन आणि वोडकासाठी उत्पादन शुल्कात ही कपात लागू झालेली आहे . तर दुसरीकडे प्रशासनाने नव्या वर्षाकरिता नवे मद्याचे दर सांगितले आहेत .
परंतु नवीन वर्षा आधीच हा नवा साठा दुकानांमध्ये विक्रीकरिता आल्यास ख्रिसमस व नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मद्यप्रेमींना दारू ही अत्यंत स्वस्त दरांमध्ये उपलब्ध होऊ शकेल . राज्यामध्ये शुल्क कपात लागू झाली असली तरीदेखील दुकानातील मद्याचा जुना साठा असल्याचे तो मागील जुन्या किमतीला विकला जात आहे . यामुळे स्वस्त दरात दारू उपलब्ध झालेली नाही . परंतु येत्या काही दिवसांमध्ये दारूच्या दुकानांमध्ये नवा साठा नव्या किमती सोबत उपलब्ध होणार आहे .
व्हिस्कीचे नवे दर ७५० एमएलसाठी
मॅकडॉवल नं १ – ६०० रुपये
इम्पेरियल ब्ल्यू- ६०० रुपये
रॉयल स्टॅग – ६८० रुपये
बॅगपायपर – ५२० रुपये
डीएसपी ब्लॅक – ५६० रुपये
ब्लेंडर्स प्राइड – १३०० रुपये
रॉयल चॅलेंज- ८४० रुपये
अँटीक्विटी ब्ल्यू – १४०० रुपये
सिग्नेचर – १३०० रुपये
रॉकफोर्ड रिसर्व – १५०० रुपये
ब्लॅक अँड व्हाईट – २५०० रुपये
१०० पायपर्स – २५०० रुपये
जिम बिम – २७६० रुपये
जॅक डॅनीयल्स- ४४५० रुपये