मन सुन्न झाले : केवळ मालमत्तेसाठी मुलाने आईवडिलांना काढले घराबाहेर.

शेअर करा.

जळगाव : केवळ मालमत्तेसाठी मुलाने आपल्या आईवडिलांना घराबाहेर काढल्याची घटना घटली आहे . झाले असे की आई , वडिलांच्या नावावर असलेली शेती , घर व जागा आपल्या नावावर होत नसल्याचे पाहून मुलानेच वृध्द आई व वडिलांना मारहाण करुन घरातून हाकलून दिले . हा प्रकार तालुक्यातील भोकर येथे घडला आहे .

तसेच याआधीदेखील मुलाने मारहाण केली होती तर सुनेने विळ्याने वार केल्याची घटना घडली होती . मात्र अद्यापही पोलिसांनी त्यांच्याविरुध्द कारवाई केली नसल्याचा आरोप या वृध्द दाम्पत्याने केला आहे . या वृध्द दाम्पत्याने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे . जागा व घर स्वत : च्या कमाईचे असल्याने आपण ते त्याला देणार नाही तसेच शेत वडिलोपार्जित असल्याने ते कायद्यानुसार त्याच्या नावावर करायला तयार आहोत . काही मालमत्ता मुलीच्या नावावर केल्यामुळेच मुलगा सून यांच्याकडून त्रास दिला जात आहे . तालुका पोलीस ठाण्यात ८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल होऊन देखील तपासी अमलदारांनी मुलगा व सुनेला अटक केली नाही , असे या दाम्पत्याचे म्हणणे आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply