महाऑनलाईन वेबसाईट पडली हँग! अर्ज दाखल करण्यासाठी निर्माण झाल्या अडचणी

दोंडाईचा : शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . यात ६ ऑगस्ट २०२१ ते २० ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे . मात्र शासनाचे अधिकृत वेबसाईट हँग होत असल्याने विद्यार्थांना अडचणीचा सामाना करावा लागत आहे . क्रिमीलेअर आदी दाखल्याची मागणी वाढली आहे . शिवाय भरतीसाठी प्रवर्ग निश्चित करण्यासाठी क्रिमीलेअर सादर करणे आवश्यक आहे . उत्पन्नाचे दाखले आठ ते दहा दिवस विलंब होत असल्याने आणि पुढे चार डेस्क वर कागदपत्रे उत्पन्न ,सादर होत असल्याने , अंगठा , डिजिटल स्वाक्षरी होण्यासाठी अडचणी येत आहे .
चार डेस्क पैकी पहिल्या डेस्कची वेबसाईड २ दिवसांपासून बंद पडत आहे.शिवाय कालपासून सर्वत्र पाऊस होत असल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे यामुळे देखील दाखले मिळण्याची शक्यता कमी झाली आहे यामुळे विद्यार्थ्यांसह भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते . त्यामुळे वरील अडचणी त्वरित दूर होणे आवश्यक आहे

Leave a Reply

Your email address will not be published.