महागाईने ग्राहकांचे मोडले कंबर, सामान्य नागरिकांनी काय करावे

शेअर करा.

नवी दिल्ली : जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने होत असलेली वाढ सामान्य नागरिकांचे कंबरच मोडले आहे . इंधन , खाद्यतेल त्याच बरोबर वीज दरवाढीने डिसेंबर महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर वाढून ५.५ ९ टक्क्यांवर नेऊन सोडले आहे .

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी डिसेंबर २०२१ च्या किरकोळ महागाई दराची सविस्तर आकडेवारी सादर केलेली आहे . अन्नधान्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने महागाईचा दर हा वाढला . डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ४.०५ टक्क्याने वर आलेला आहे . नोव्हेंबरमध्ये हाच दर १.८७ टक्के होता . डिसेंबर २०२१ मध्ये भाज्यांचा वाढणारा महागाई दर मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत कमी होऊन त्यात २.९९ टक्केची घसरण झाली . परंतु खाद्यतेलाच्या किमती अजूनही चढ्याच आहेत . खाद्यतेलाच्या महागाई दरात तब्बल २४.३२ टक्के तर इंधन आणि विजेच्या महागाईमध्ये १०.९ ५ टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply