• Tue. Aug 16th, 2022

  महापालिकेचा ढिसाळ कारभार :जळगाव मनपा दोन वर्षात निधी खर्च न करू शकल्याने ३ कोटी २८ लाख शासनाने मागितले परत.

  ByKhandeshTimes

  Sep 16, 2021

  जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेतून घेण्यात येणारी कामे दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण करून कामांचा पूर्ण निधी दोन वर्षांचा कालावधीत खर्च करणे बंधनकारक आहे . मात्र जळगाव मनपा दोन वर्षात निधी खर्च न करू शकल्याने खर्च न केलेले ३ कोटी २८ लाख शासनाने परत मागितले आहे . याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका शाखेने मनपाला पत्र पाठवून तीन दिवसांच्या आत हा निधी नगरपालिका शाखेकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत .

  महानगरपालिकेला २०१५ ते २०१ ९ या कालावधीत जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीपैकी ३ कोटी २८ लाख ८७ हजार रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे . ज्यात जिल्हा नगरोत्थान योजना , नागरी दलित वस्ती सुधार योजना व दलित वस्ती सुधार योजना या योजनांचा समावेश आहे . वेळेत निधी खर्च न करता आल्याने अनेक महिन्यांपासून मनपाकडे अखर्चीत म्हणून पडून असलेला ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी परत शासनाकडे जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत .

   

  याबाबत दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण निधी खर्च करणे बंधनकारक आहे . मात्र जळगाव मनपा दोन वर्षात निधी खर्च करू न शकल्याने खर्च न केलेले ३ कोटी २८ लाख शासनाने परत मागितले आहेत

  Leave a Reply

  Your email address will not be published.