• Tue. Aug 16th, 2022

    महाराष्ट्रातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये होणार पोटनिवडणुका.। Election।

    ByKhandeshTimes

    Nov 20, 2021

    मुंबई , दि . 18 ( प्रतिनिधी ) : राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे , अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू . पी . एस . मदान यांनी दिली आहे .

     

    श्री . मदान यांनी सांगितले की , निधन , राजीनामा , अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे . 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील . त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल . नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत असेल . त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील . मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी होईल . मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल .

     

    मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 पर्यंतच असेल . या सर्व ठिकणी 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल .

    Leave a Reply

    Your email address will not be published.