महाराष्ट्रात चंदिगढ वरून बनावट इंजेक्शनची आयात आली समोर.

जळगाव : शरीराची रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी खऱ्या इंजेक्शनच्या नावाखाली बनावट स्वरूपाचे इंजेक्शन विक्री प्रकरणाचे चाळीसगाव मुख्य केंद्र म्हणून समोर आलेले असून , राज्यासोबत इतर राज्यातही त्याचे संबंध असल्याचे समोर आले आहे . यादरम्यान , चाळीसागव पोलिसांचे एक पथक हे रविवारी चंदीगडला रवाना झाले . सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे , पंजाबमधून हे बनावट इंजेक्शन्स पूर्ण महाराष्ट्रभरात आयात केले जात आहेत . अन्न आणि औषध प्रशासन ( एफडीए ) मुंबईच्या गुप्तचर विभागाने चाळीसगावात केलेल्या कारवाईमध्ये हा प्रकार उघडकीस आलेला आहे .या प्रकरणी एफडीएने जोगेश्वरी फार्माचे मालक जितेंद्र प्रभाकर खोडके ( वय २७ , रा कळमडू , ता . चाळीसगाव ) व श्रीक्रीधा चाळीसगाव टॉवर इंटरनॅशनल हेल्थकेअरचे मालक सुनील ढाल ( रा . डेराबस्सी , सासनगर , पंजाब ) यांनविरुद्ध चाळीसगाव पोलीस स्टेशनला ७ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला आहे .

शहरातील जे . जे . अण्णा शेजारील गॅस एजन्सी याठिकाणी हा छापा टाकण्यात आला होता . एफडीएने केलेल्या कारवाईत आतापर्यंत बनावट इंजेक्शनच्या २२० कुपींसह इतर औषधी देखील जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे . तपासादरम्यानही सर्व इंजेक्शन चंदीगड येथून आयात केले असल्याचे निष्पन्न झाले . यामुळे तपासाधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांचे पथक चंदीगड याठिकाणी रवाना झाले आहे . दरम्यान , एफडीएचे जळगावचे निरीक्षक डॉ . अनिल माधवराव माणिकराव यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.