महाराष्ट्रात पोलीस भरतीला होणार सुरुवात, जाणून घ्या सविस्तर बातमी

शेअर करा.

Khandesh times News : पोलीस भरतीची वाट पाहत असलेल्यांसाठी मोठी खुशखबर असून महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्प्यात जवळपास ७२०० पदांची पोलीस भरती होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे . मागील काही महिन्यांपासून पोलीस भरतीच्या वाट पाहत असणाऱ्यांची प्रतीक्षा आता समाप्त होणार आहे .राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी माहिती देतांना कळविले की , राज्यात प्रथम टप्प्यामध्ये आम्ही पोलीसभरतीची प्रक्रिया राबविली होती . यामध्ये ५ हजार ७०० पदे भरलेली होती . आता द्वितीय टप्प्यात ७ हजार २०० पदे लवकरच भरली जाणार आहेत .

 

८७ पोलीस पोलीस स्टेशनच्या इमारतींची नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे . त्यामध्ये नगर जिह्यातील राहुरी , नेवासा व पाथर्डी पोलीस स्टेशन्सचा समावेश आहे . दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात संबंधित राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद होईल . मार्चनंतर नव्याने घरबांधकामाची कामे मार्गी लागणार आहे . नगर जिल्हा मध्ये देखील पोलिसांचा घरांचा प्रश्न मार्गी लागेल , ‘ असे त्यांनी सांगितले .

 

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गृहमंत्री वळसे यांच्या उपस्थितीत बैठक झाली .यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी आमदार संग्राम जगताप , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके , नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी . जी . शेखर पाटील , जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अधिकारी उपस्थित होते .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply